अंतर्गत दरवाजे
एकाच ओळीत तीन दरवाजे वास्तूत कधीही असू नयेत. प्रवेशद्वाराव्यतिरिक्त इतर कुठलाही दरवाजा जास्त आकर्षक नसावा. दरवाजे 2, 4, 6 वगैरे अशा सम संख्येत असावेत.विषम संख्येत असले तर एक दरवाजा नेहमी बंद करावा.
दरवाजा उघड बंद करताना आवाज होऊ नये. तुटलेला दरवाजा नसावा. कड्या भक्कम असाव्यात. चौकट मजबूत असावी. दरवाजा जड असावा. उत्तम रंगसंग असावी. वूडफिनिश रंग सगळ्यात उत्तम!