प्लॉटचे योग्य व अयोग्य प्रकार
वास्तुशास्त्राप्रमाणे जमिनीच्या प्लॉटचे योग्य व अयोग्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत
- आयताकृती भूखंड
वास्तुशास्त्रात आयताकृती भूखंड हा योग्य भूखंड म्हणून ओळखला जातो. असा भूखंड शुभ असतो व तो निश्चितच लाभदायक ठरतो. संपन्नता, समृद्धी व कार्यसिद्धी देतो.
- चौरस आकाराचा भूखंड
चौरस भूखंडात चारही बाजू सारख्याच असतात. या भूखंडाचे सर्व कोपरे ९० अंशाचे असतात. भूखंडाचा चौरसाकृती आकार शुभ आणिलाभदायक असतो. या भूखंडात राहिल्याने जीवन सुखी व समृद्ध होते. वंशवृद्धी होते. उत्त्तम आरोग्य लाभते.
- गोमुखी भूखंड
ज्या भूखंडाचा आकार दर्शनी भागात लहान असतो आणि मागील भाग दर्शनी भागापेक्षा मोठा असतो त्या भूखंडाला गोमुखी भूखंड म्हणतात. असा भूखंड लाभदायी असतो.
- त्रिकोणी आकाराचा भूखंड
भूखंड त्रिकोणी आकाराचा नसावा. हा भूखंड अशुभ फळं देतो. यात सुख, समृद्धी, सौख्य लाभत नाही. संकटं येत राहतात. मन:स्वास्थ्य लाभू शकत नाही.
- वर्तुळाकार भूखंड
वर्तुळाच्या आकाराचा भूखंड काही प्रमाणात चांगली फळे देतो. त्यामुळे शक्यतो असा भूखंड असला तरी मात्र बांधकाम चौरसच असावे. शैक्षणिक प्रगती चांगली राहते.
- विषमाकार भूखंड
चारही बाजू विषम अथवा वेगवेगळ्या लांबीच्या ज्या भूखंडाच्या असतात असा प्लॉट अशुभ ठरतो. असा भूखंड धनक्षय करतो आणि समृद्धी नष्ट करतो. त्यामुळे अशा आकाराचा भूखंड टाळावा.