बाथरूम
बाथरूम वास्तूच्या पूर्वेला असावे.
बाथरूममधील गीझर आग्नेय दिशेला असावा.
नळ, वॉश बेसिन, शॉवर, टब हे ईशान्य अथवा पूर्व दिशेला असणे योग्य.
टब असल्यास त्यात बसताना पाय दक्षिणेकडे होऊ नयेत.
अंघोळ करताना तोंड पूर्वे किंवा उत्तरेकडे करावे.
धुवायचे कपडे वायव्य दिशेला व्यवस्था करावी.
बाथरूम मध्ये कमोड किंवा संडासचे भांडे नसावे.
आरसा पूर्व किंवा उत्तरेकडे असावा.
दरवाजा पूर्व, उत्त्तर भागात असावा.
साबण, शाम्पू, ब्र्रश ठेवण्यासाठीचे छोटे रॅक दक्षिण किंवा वायव्य दिशेला करावे.
टाईल्स आल्हाददायक रंगाच्या असाव्यात. पांढरा अथवा गुलाबी रंग उत्त्तम.
बाथरूम वापरताना मन प्रसन्न वाटले पाहिजे.
शरीराबरोबर मनाचीही स्वच्छता व्हायला हवी कारण दिवसाची सुरुवात येथून होते.