कोपरा वाढीव असलेले भूखंड
योग्य किंवा अयोग्य भूखंड कोणताहे काटेकोरपणे तपासून मगच भूखंड खरेदी केला पाहिजे.
आपण कोपरारहित भूखंड पाहिले, तसे आता एखादा कोपरा वाढलेले भूखंड कसे असतात ते वाचूया.
वाढीव ईशान्य कोपरा : भूखंडाचा जेव्हा ईशान्य कोपरा वाढीव असतो तेव्हा ईश म्हणजे शिव तत्त्व प्रभावी असते आणि तो भूखंड लाभदायक असतो. अशा भूखंडात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य यांचा लाभ होतो. मनाला समाधान मिळते. घरात, उत्साह, चैतन्य यांचे वातावरण असते.
वाढीव आग्नेय कोपरा : एखाद्या भूखंडाचा आग्नेय कोपरा म्हणजेच दक्षिण पूर्व दिशेतला कोपरा वाढीव असेल, तर मात्र असा भूखंड लाभ देत नसतो. आग्नेय कोपरा वाढल्यामुळे अग्नी तत्त्व प्रभावी बनते. घरातील शांतता बाधित होते. कलह, वादविवाद होतात.
वाढीव नैऋत्य कोपरा: एखाद्या भूखंडाचा जर नैऋत्य कोपरा म्हणजेच दक्षिण पश्चिम कोपरा वाढीव असेल, तर असा भूखंड लाभदायक नसतो. अशा भूखंडात सुख मिळत नाही.
वाढीव वायव्य कोपरा: एखाद्या भूखंडाचा जर वायव्य कोपरा जर वाढीव असेल, तर असा भूखंड लाभदायक नसतो. कारण वायू तत्त्व अधिक प्रभावी बनते.
जेव्हा असे वाढीव कोपरा असलेले, अशुभ परिणाम देणारे भूखंड नशिबात येतात, तेव्हा ते भूखंड चौरस करून घ्यावेत आणि उर्वरित भूखंडात फळझाडे, फूलझाडे लावावीत, त्यांच्यामुळे वाढीव कोपऱ्याचे दुष्परिणाम कमी होतील