स्वयंपाकघर किंवा किचन
किचन वास्तूतील एक महत्त्वाचे केंद्र आहे. कारण येथे जेवण शिजवले जाते. आणि घराची मालकीण ते काम करते. येथूनच संपूर्ण कुटुंबाला अन्नपुरवठा होतो. म्हणजे प्रत्येकाला जगण्यासाठीचा आवश्यक उर्जा पुरवठा येथूनच होतो. येथूनच सुख, शांती, आरोग्य व मन:शांतीचा मार्ग सुरू होतो. घरातील लक्ष्मीचा येथे सतत वावर असतो.
किचन हे वास्तूच्या आग्नेय दिशेला असावे. किचन ओटा पूर्वेकडे असावा. गॅसची शेगडी, स्टोव्ह, ओव्हन हे किचनच्या आग्नेयेला असावे. स्वयंपाक करताना स्त्रीचे तोंड पूर्वे दिशेकडे असावे. बेसिन ईशान्येला करावे. नळ, पाणी, माठ ईशान्येला घ्यावे.
दक्षिण दिशेला रॅक, जड सामान, डबे, कोठ्या ठेवावे. डायनिंग टेबल वायव्य किंवा पश्चिम दिशेला असावे. पश्चिम शक्य नसेल तर पूर्व किंवा उत्तर दिशेस असावे. आग्नेय दिशेला इलेक्ट्रिकल उपकरणे असावीत. रंगसंगती सुंदर असावी. अडगळ करू नये. स्वच्छता आणि टापटीप राखावी.