दिवाणखाना अथवा हॉल
हॉल पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावा. दारे पूर्व किंवा उत्तर दिशेला असावीत. व्यवस्था अशी करावी की येणाऱ्यां आगांतुकाचे तोंड बसल्यावर दक्षिण किंवा नैऋत्येस असावे. घरातील प्रमुख व्यक्तीचे तोंड पूर्व अथवा उत्तरेकडे असावे.
टीव्ही, स्पीकर वगैरे इलेक्ट्रिकच्या वस्तू आग्नेयेत ठेवा. इलेक्ट्रिकल बोर्ड आग्नेय दिशेला असावा. हॉलमधील घड्याळ पूर्व दिशेकडे तोंड करून असावे. हॉलमध्ये हिंसा, शोक वगैरे दर्शविणारी चित्रे लावू नयेत. निसर्गचित्र वगैरे लावावीत. शोकेस, कॅबिनेट किंवा जड फर्निचर दक्षिण भिंतीला लावून ठेवावे. रंगसंगती आल्हाददायक असावी. भडक रंग वापरू नयेत.
जिना दक्षिण, पश्चिम वा नैऋत्येला घ्यावा. टेलिफोन, फॅक्स वगैरे नैऋत्येला ठेवावा. दिवाणखान्यातील फर्निचर रचना सुटसुटीत असावी.