Get it on Google Play
Download on the App Store

योग्य भूखंडाची निवड

प्लॉट विकत घेताना आणि वास्तू बांधण्याआधी भूखंडातली माती चांगल्या प्रतीची असावी. तिचा गंध चांगला असावा.

अशीच जागा खरेदी करावी जी पूर्वीच्या मालकाला लाभकारक ठरली असेल. सुख आणि समृद्धी यांचा अनुभव तिथे राहणाऱ्या माणसांनी अनुभवला असावा.

खडकाळ, वारूळयुक्त, भूसभूशीत, अस्थीयुक्त, काटेरी झुडपे असलेली जागा निश्चितपणे टाळावी.

मातीच्या रंगाचे परीक्षण पुढीलप्रमाणे करावे.

१२ फूट खोल खड्डा खणावा. जर ३ फुटांपर्यंत काळी माती असेल. नंतर त्या थरा खाली पांढरी अथवा लाल माती असेल तर असा भूखंड विकत घेण्यास हरकत नाही. काळी माती असलेली आणि भूसभूशीत जमीन बांधकामासाठी योग्य नसते.

आपणांस जमिनीसंबंधी आणखी एक परीक्षा करता येऊ शकते.

२ इंच X २ इंच X२ इंच असा खड्डा खणावा तो परत मातीने भरावा. संपूर्ण भरल्या नंतर जर माती उरत असेल, तर तो भूखंड लाभदायक असतो. जर माती उरत  नसेल, तर तो भूखंड सामान्य दर्जाचा असतो. आणि जर सगळी माती भरूनही खड्ड्यात आणखी जागा शिल्लक राहात असेल, तर असा भूखंड आजीबात लाभदायक नसतो. असा भूखंड टाळावा.

आता त्याचं खड्ड्यात पाणी भरावे. जर हे पाणी मूरण्यास एक तासापेक्षा अधिक वेळ लागला तर तो भूखंड चांगला असतो. जर पाणी पूर्ण मुरल्या नंतर जमिनीला भेगा दिसत असतील तर तो भूखंड लाभदायी नसतो. अशा भूखंडामुळे बांधकामाचा खर्च निश्चितपणे वाढतो. अशा भेगा जमिन भुसभुशीत असल्याचे संकेत देतात. अशा भूखंडामुळे पायाभरणीला अडथळे येतात. या मातीत मलनि:सारण अथवा सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.

संपूर्ण वास्तुशास्त्र-भाग पहिला

महाकाल
Chapters
भूमिका वास्तुशास्त्राचा इतिहास वास्तुशास्त्राचा उगम वास्तुशास्त्र- शास्त्र कि थोतांड? वास्तुशास्त्राची गरज काय? वास्तुशास्त्राचे फायदे योग्य भूखंडाची निवड कोणते भूखंड टाळावेत ? भूखंडाचा आकार बांधकाम रस्ता विहीर कुंपण आवारातील रचना व्यावहारिक द़ृष्टिकोन मुहूर्तशास्त्र प्लॉटचे योग्य व अयोग्य प्रकार कोपरारहित भूखंड कोपरा वाढीव असलेले भूखंड वास्तू बांधताना घ्यावयाची काळजी वास्तुपुरुष विथिशुला देवघर दिवाणखाना अथवा हॉल स्वयंपाकघर किंवा किचन शयनकक्ष किंवा बेडरूम बाथरूम शौचालय किंवा संडास : अभ्यासिका किंवा स्टडी रूम तिजोरी स्टोअर रूम जीना बाल्कनी आणि टेरेस अंतर्गत दरवाजे ब्रह्मस्थान पुढील भागात