Get it on Google Play
Download on the App Store

कोणते भूखंड टाळावेत ?

स्मशानाच्या जागेवरचा भूखंड कधीही घेऊ नये. स्मशानाच्या आसपास देखील भूखंड नसावा. एखाद्या जागेवर कुणाचा अनैसर्गिक पद्धतीने मृत्यु झाला असेल, उदाहरणार्थ अपघात, आजार, खून, आत्महत्या वगैरे. तर शक्यतो अशी जागा घेणे टाळावे. अशा जागेत पिशाच्च योनी अथवा अतृप्त आत्म्यांचा त्रास सहन करावा लागतो. आणि हा त्रास त्या जागेवर राहणाऱ्या सर्वाना होतो.

पूलाजवळील भूखंड खरेदी करू नये. पूल जर उत्त्तर दिशेत किंवा पूर्वे दिशेस  असेल तर असा भूखंड निश्चितपणे टाळावा. दक्षिण किंवा पश्चिमे दिशेकडे पूल असेल भूखंड घेण्यास हरकत नाही.

जर भूखंडात विहीर असेल आणि तिची व्याप्ती शेजारच्या भूखंडावरही असेल तर असा भूखंड टाळावा.

भूखंड टेकडीवर नसावा. भूखंड जर टेकडी शेजारी किंवा पर्वतानजीक असेल व त्याचा उतार उत्तर अथवा पूर्वेकडे असेल तर असा भूखंड घेण्यास हरकत नाही.

संपूर्ण वास्तुशास्त्र-भाग पहिला

महाकाल
Chapters
भूमिका वास्तुशास्त्राचा इतिहास वास्तुशास्त्राचा उगम वास्तुशास्त्र- शास्त्र कि थोतांड? वास्तुशास्त्राची गरज काय? वास्तुशास्त्राचे फायदे योग्य भूखंडाची निवड कोणते भूखंड टाळावेत ? भूखंडाचा आकार बांधकाम रस्ता विहीर कुंपण आवारातील रचना व्यावहारिक द़ृष्टिकोन मुहूर्तशास्त्र प्लॉटचे योग्य व अयोग्य प्रकार कोपरारहित भूखंड कोपरा वाढीव असलेले भूखंड वास्तू बांधताना घ्यावयाची काळजी वास्तुपुरुष विथिशुला देवघर दिवाणखाना अथवा हॉल स्वयंपाकघर किंवा किचन शयनकक्ष किंवा बेडरूम बाथरूम शौचालय किंवा संडास : अभ्यासिका किंवा स्टडी रूम तिजोरी स्टोअर रूम जीना बाल्कनी आणि टेरेस अंतर्गत दरवाजे ब्रह्मस्थान पुढील भागात