विहीर
विहीर ही इमारतीचे बांधकाम करताना सर्वांत अगोदर बांधावी. बांधकाम करण्यासाठी याच खोदलेल्या विहीरीचे पाणी जर वापरले तर ते लाभदायक असते.
विहीर किंवा बोर भूखंडाच्या ईशान्य भागात असावे. विहीर ही गोलाकारच असावी.
दोन भूखंडाच्या मध्ये एक विहीर कधीही वापरू नये.
यथायोग्य मुहुर्त पाहून पूजा करून मगच विहीर खोदावी. विहीर खोदताना शुभ नक्षत्र पाहावे. रोहिणी, हस्त, उत्तरा, भाद्रपद, उत्तरा हे नक्षत्र विहीर खोदण्यासाठी उपयुक्त असतात.