महंमदसाहेबांची बदली 3
‘कशाला?’
‘अगं, ते महंमदसाहेब आज जाणार आहेत.’
‘उद्या ना जाणार होते?’
‘नाही, आजच जाणार आहेत. तुझी फातमा आली होती ना? तिने नाही का सांगितले?’
‘तिला नक्की दिवस माहित नव्हता.’
‘चल. तुझ्या मैत्रिणीला निरोप दे.’
‘बाबा, फातमास मी काय देऊ?’
काय देतेस?’
तिला एखादी सुंदर ओढणी घेऊन दिली असती.’
खरंच छान होईल. मी मागवतो हो.’
‘आणि बळवंतरावांनी एका दुकानातुन सुंदर रेशमी ओढणी ताबडतोब मागवून घेतली. चित्राला ती आवडली. पित्याबरोबर ती स्टेशनवर गेली.
‘रावसाहेब, आपण कशाला आलेत मुद्दाम?’ फौजदारसाहेब म्हणाले.
‘मित्र म्हणून आलो. रावसाहेब म्हणून नव्हे आणि चित्राला यायचे होते.’
चित्राने फातमाला ती ओढणी दिली. फातमाने खांद्यावरून व डोक्यावरून ती घेतली. छान दिसत होती.
‘फातमा, किती तू छान दिसतेस?’
‘चित्रा, तूही मला सुरेख दिसतेस.’
‘ज्याच्यावर आपण प्रेम करतो ते नेहमी चांगलेच दिसते.’ बळवंतराव म्हणाले.