Get it on Google Play
Download on the App Store

सोनीचे लग्न 4

“तुम्ही परके नाही मनूबाबा. परंतु घरी सांगायला नको का? आपली वाट बघत्ये केव्हाची. आणि सोन्ये, इतक्या उजाडत उठून कशाला ग भाकर्‍या करीत बसलीस?” साळूबाईने प्रेमाने विचारले.

“रामूबरोबर भातुकली करण्यासाठी! त्याला दिवसभर असते काम. माझ्याबरोबर भातुकली खेळायला त्याला वेळ कुठं आहे? म्हणून आज सकाळीसच करू म्हटलं.” सोनी हसून म्हणाली.

“भातुकली खेळायला तुम्ही का आता लहान?” तिने विचारले.

“मग का आम्ही मोठी झालो?” सोनीने विचारले.

“नाही वाटतं? आता लग्न हवं करायला तुझं. समजलीस ग सोन्ये. लहान नाहीस हो आता. उद्या सासूकडे गेलीस म्हणजे स्वत:ला लहान समजशील व झोपून राहशील. सासू मग बोलेल, रागावेल.” साळूबाई म्हणाली.

“मारणार नाही ना?” हसून सोनीने विचारले.

“मारील सुद्धा. काही काही सास्वा खाष्ट असतात हो सोन्ये. तयार रहा. लाड नाही मग तिथं चालयचे!” रामू म्हणाला.

“पण मी अशी सासू मिळवीन, जी माझी जणू आई होईल. मी थंडीत लवकर जायला लागले तर जी म्हणेल, की नीज हो जरा आणखी, लहान आहेस तू.” सोनी म्हणाली.

“अशी सासू मिळायला पुण्याई लागते.” रामू म्हणाला.

“आहेच माझी पुण्याई. आणि माझी पुण्याई नसली तरी मनूबाबांची आहे. माझ्या आईचा आशीर्वादही माझ्याजवळ असेल. नाही का हो बाबा?” सदगदित होऊन सोनीने विचारले.

“आहे हो तुझ्या आईचा आशीर्वाद.” म्हातारा म्हणाला.

“रामू, जा आता कामावर वेळ झाली.” साळूबाई म्हणाली.

मनूबाबा

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
जन्मभूमीचा त्याग 1 जन्मभूमीचा त्याग 2 जन्मभूमीचा त्याग 3 एकाकी मनू 1 एकाकी मनू 2 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 1 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 2 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 3 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 4 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 5 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 6 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 7 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 8 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 9 सोने परत आले 1 सोने परत आले 2 सोने परत आले 3 सोने परत आले 4 सोने परत आले 5 सोने परत आले 6 संपतरायाचे लग्न 1 संपतरायाचे लग्न 2 संपतरायाचे लग्न 3 सोनी 1 सोनी 2 सोनी 3 सोनी 4 सोनी 5 सोनी 6 सोनी 7 सोनी 8 सोनी 9 सोनी 10 सत्य लपत नाही 1 सत्य लपत नाही 2 सत्य लपत नाही 3 सत्य लपत नाही 4 सोनीचा नकार 1 सोनीचा नकार 2 सोनीचा नकार 3 सोनीचा नकार 4 सोनीचा नकार 5 सोनीचा नकार 6 सोनीचे लग्न 1 सोनीचे लग्न 2 सोनीचे लग्न 3 सोनीचे लग्न 4 सोनीचे लग्न 5 सोनीचे लग्न 6 सोनीचे लग्न 7 सोनीचे लग्न 8 सोनीचे लग्न 9 सोनीचे लग्न 10 सोनीचे लग्न 11 जन्मभूमीचे दर्शन 1 जन्मभूमीचे दर्शन 2 जन्मभूमीचे दर्शन 3