अष्टांग सांधनें साधिती पव...
अष्टांग सांधनें साधिती पवन । ज्यासि योगीजन शिणताती ॥ १ ॥
तो हा कृष्ण गोपीगोपाळांमाझारी । क्रीडा नानापरी करी आत्मा ॥ २ ॥
अठरा साहिजणें बोलती परवडी । तो माखणासि जोडी स्वयें कर ॥ ३ ॥
निवृत्तीचें ध्येय कृष्ण हाचि होय । गयनिनाथें सोय दाखविली ॥ ४ ॥