मन निवटलें ज्ञान सांडवलें...
मन निवटलें ज्ञान सांडवलें । ठाणदिवी केलें ध्यानालागीं ॥१॥
उमटल्या ध्वनि कृष्ण नामठसे । सर्व हृषीकेश भरला दिसे ॥२॥
दिशा दुम ध्यान हारपली सोय । अवघा कृष्ण होय ध्यानींमनीं ॥३॥
निवृत्तिमाजि घर मनाचा सुघडु । कृष्णचि उपवडु दिसतसे ॥४॥