मृगजळाभास लहरी अपार । हा ...
मृगजळाभास लहरी अपार । हा प्रपंच पसारा उदरीं जया ॥१॥
तें रूप वैकुंठ कृष्णरूपें खेळे । गोपाळांचे लळे यमुनातटीं ॥२॥
जाळूनि इंधन उजळल्या दीप्ती । अनंतस्वरूपी एक दिसे ॥३॥
निवृत्ति सागर ज्ञानार्क आगर । कृष्णाचि साचार बिंबलासे ॥४॥