निकट वेल्हाळ नेणों मायाजा...
निकट वेल्हाळ नेणों मायाजाळ । विव्हळ पाल्हाळ नेणों कांही ॥१॥
तें रूप श्रीधर मानवी अकार । सर्व निराकार सिद्धि वोळे ॥२॥
कुटूंबआचार कुळवाडी साचार । सर्व हा श्रीधर एका एक ॥३॥
निवृत्ति निगग्न गयनीच प्रतिज्ञा । नामें कोटि यज्ञा होतजात ॥४॥