नित्य निर्गुण सदा असणें ग...
नित्य निर्गुण सदा असणें गोविंदा । सगुणप्रबंधा माजि खेळे ॥१॥
तें रूप सगुण अवघेंचि निर्गूण । गुणि गुणागुण तयामाजि ॥२॥
अनंत तरंगता अनंत अनंता । सृष्टीचा पाळिता हरि एकु ॥३॥
निवृत्ति परिमाण अनंत नारायण । सर्वाहि चैतन्य आपरूपें ॥४॥