रूप हें सावंळे भोगिताती ड...
रूप हें सावंळे भोगिताती डोळे । उद्धवा सोहळे अक्रूरासी ॥१॥
पदरज वंदी ध्यान हें गोविंदी । उद्धव मुकुंदीं तल्लीनता ॥२॥
विदुक्र सुखाचा नाम स्मरे वाचा । श्रीकृष्ण तयाचा अंगीकारी ॥३॥
निवृत्तीचें ध्यान ज्ञानदेव खूण । सोपान आपण नामपाठें ॥४॥