भरतें ना रितें आपण वसतें ...
भरतें ना रितें आपण वसतें । सकळ जग होते तयामाजी ॥ १ ॥
तें रूप पैं ब्रह्म चोखाळ सर्वदा । नित्यता आनंदा नंदाघरीं ॥ २ ॥
आशापाश नाहीं घरीं पूर्णापूर्ण । सकळ जग होणे एक्यारूपें ॥ ३ ॥
निवृत्ति तटाक ब्रह्म रूप एक । जेथें ब्रह्मादिक ध्याती सदा ॥ ४ ॥