विस्तार विश्वाचा विवेकें ...
विस्तार विश्वाचा विवेकें पैं साचा । बोलताचि वाचा हारपती ॥ १ ॥
तें रूप श्रीधर कृष्णाचा आकार । सर्व निराकार एकरूपें ॥ २ ॥
नसतेनि जीव असतेनि शिव । तदाकार माव मावळली ॥ ३ ॥
निवृत्ति स्वरूप कृष्णरूप आप । विश्वीं विश्वदीप आपेंआप ॥ ४ ॥