न साधे योगी न संपडे जगीं ...
न साधे योगी न संपडे जगीं । तें नंदाच्या उत्संगी खेळें रूप ॥ १ ॥
कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळीं । गोपिका सकळीं वेढियेला ॥ २ ॥
गाईचे कळप गोपाळ अमुप । खेळतसे दीप वैकुंठीचा ॥ ३ ॥
निवृत्ति दीपडें वैकुंठें साबडें । यशोदामाये कोडें चुंबन देत ॥ ४ ॥