अनंत सृष्टि घटा अनंत नाम ...
अनंत सृष्टि घटा अनंत नाम मठा । परिमाण पैठा आत्माराम ॥१॥
तें रूप साजिरें चतुर्भुजवेष । वैकुंठीचे लेख नंदभाग्य ॥२॥
सिद्धीचें साधन चिंतामणि धन । कल्पवृक्ष घन वसते जेथें ॥३॥
निवृत्तिचें मूळ गोपाळ सकळ । साधक दयाळ हरि होय ॥४॥