१९
असती अभंग ताटीचे हे सोळा । दोन वर ताळा पुराणि केचे ॥१॥
ऐसें हे अठरा कैवल्याचे दीप । कामधेनु कल्पतरु जगीं ॥२॥
उदयलें जनार्दन वस्त्राकाशी । ब्रह्म तेजोराशी चिंतामणी ॥३॥
करावेम पठण नित्य हेचि भावें । तैसेंचि सेवावें सिदरुसी ॥४॥
गुरुसी शरण व्हावे नायकावी मात । माता पिता कांत असो कोणी ॥५॥
लाभावें अक्षय्य तेंचि ब्रह्मसुख । पाचावें ऐहिक परत्रही ॥६॥
निंदोत त्यागोंत स्त्रिया पुत्र सखे । ढळो नये सुखें त्यागावे ते ॥७॥
सेवावा सतत एकचि तारक । जन आशा दुःख नरक मुळ ॥८॥
सकळांसीं हेचि देवोनियां भाक । बोमातसो हांक मारोनिया ॥९॥
मुक्तेश्वर म्हणे पती बाप माय । श्रीगुरुचि वाय येर सर्व ॥१०॥