Get it on Google Play
Download on the App Store

१३

घर्मार्थ काम मोक्ष देह प्राण । जीवीत वित्त घन अंतर बाह्मा ॥१॥

सकळही सत्य अर्पावें गुरुसी । व्हावें देहें दासी विकोनिया ॥२॥

अर्पावे श्रीगुरुठायी प्रेम अमर्याद । जीवें अर्पण बोधें ब्रह्मभावें ॥३॥

देहांदि मी माझें म्हणो नये कांही । भावावें सकळही अर्पण हें ॥४॥

महाल मुलुख भोग घनदारा पुत्र । मोक्षधर्म अर्थ श्रीगुरुतोचि ॥५॥

करोनय कांही चुकोनी वंचना । कलिया पतना होय नेमें ॥६॥

न्हे अनुमव अक्षय ते मुख । झालिया वंचक प्राप्त कही ॥७॥

करो नेय गुरु असो तसौ श्रेष्ठ । जरी नोहे भेटी दिवस फार ॥८॥

तयापसोनीया न घडे आत्मप्राप्ती । प्राप्तीवीण गती ठाके अंती ॥९॥

न वचे सांगतां योग एकवेळा । भेटे वेळोवेळां गुरु कराव तोचि ॥१०॥

आनंदाचा सागरु राजयोग एक । नसोचि आणिक ब्रह्माडीही ॥११॥

असती येर बहु योग प्राणायाम । शिको नये श्रम व्यर्थ तेथें ॥१२॥

न भेटेचि तेणें देहीं तो इश्वर । न हींय उद्धार ऐहिकही ॥१३॥

म्हणती भेटे देव राजयोगावीण । नाही त्या समान मुढ जगी ॥१४॥

एकचि तारक विश्वा राज योग । व्यर्थ लक्ष योग भ्रम सर्व ॥१५॥

म्हणे जनार्दन लाभे सांटी वाटी । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१६॥