Get it on Google Play
Download on the App Store

१८

नित्य हे अभंग करी तील पठण । आचरोनी पुर्ण ऐसे चिजे ॥१॥

होईल तयासी ऐहिक सर्व प्राप्ती । लाभेल पै अंती ब्रह्मपद ॥२॥

वर्तोनि करीतां पठण हे अभंग । साघेल सहज योग गुरुकृपे ॥३॥

नातळतील तयां दोष काळिकाळ । सकळ विद्या कळा होतील प्राप्त ॥४॥

हरतील दैन्यें दुर्धर महा व्याधीं । न बाघतील विषादि व्याघ्र सर्प ॥५॥

पळतील विघ्नें भयभुत बाधा । नाशेल आपदा क्लेश दुःख ॥६॥

न चलती मंत्र तंत्र उच्चाटण । प्रयोग जारण मारणादि ॥७॥

काराग्रह पीडा चुकेल बंधन । होईल संतान धन द्रव्य ॥८॥

नोहे त्या देवता क्षोम अवनीज । पावेल तो राजसन्मानही ॥९॥

लाभेल घन धान्य होईल विवाह । ऐश्वर्य वैभव मोक्ष मुक्ति ॥१०॥

नोहे अग्नि शस्त्रा पासोनिया भय । होईल उद्यमी जय वाचा सिद्धि ॥११॥

कळेल भविष्य भूत वर्तमान । अवगत ज्ञान ब्रह्माडीचें ॥१२॥

सगुणी आस तरी प्रत्यक्ष दर्शन । होईल प्राप्त संपुर्ण ऋद्धिसिद्धी ॥१३॥

जें जें तो इच्छिल होईल तें तें प्राप्त । भजेल आज्ञाकित विश्व सर्व ॥१४॥

अथवा रिगोनी अर्थी मने सावधान । करी तील नित्यश्रवण भक्तिभावें ॥१५।

होविनि शरण गुरुसी आचरिती तैसेंची । होईल फळ प्राप्त तेंचि सर्व तया ॥१६॥

एकचि गुरुशास्त्र ऐसें हेंतारक । श्रीगुरुचि एक गुरुकृपा ॥१७॥

म्हणे जनार्दन जपें हेंचि कंठी । उघडीं भ्रमताटी एकनाथा ॥१८॥