३
राजयोगेंवीण न कळे ब्राह्मज्ञानें । प्रमाणें अनुमानें मेलियांही ॥१॥
पाहोनियां ग्रंथ केलिया ते खुण । न लमें दिल्या प्राण अनंतजन्में ॥२॥
व्रते तपें नेम केलियां पठण ॥ प्रतिमा पाषाण पुजिलियां ॥३॥
न लभे जनघमें मत अभिमानें ॥ तीर्थ उद्यापनें लक्षकोटी ॥४॥
पढों नये ग्रंथ त्यागावा कुळधर्म ॥ न घ्यावें जनकर्म उदाहरण ॥५॥
सेवावें उच्छिष्ठ निर्माल्य गुरुतीर्थ ॥ ऐको नये मात कवणांची ॥६॥
न करतां ग्रहण सेवों नये काहीं । अर्पावें सकळही श्रीगुरुसी ॥७॥
मानों नयें विटाळ राहों भलतें स्थिती । स्पशें दग्ध होती पापें सर्व ॥८॥
जोडती ते मेरू पुण्याचें अगणीत । पावन समस्त श्रीगुरुचेनी ॥९॥
दर्शन पूजन गुरुशेषेंवीण । सेवन ग्रहण पातकची ॥१०॥
गुरुच्या अमक्तांचें वर्जावें दर्शन । निश्चयें पतन तयासंगें ॥११॥
पाहों नये शास्तरें पुराणें चरित्रें । करावीं गुरुशास्त्रें पठण नित्य ॥१२॥
नलगे स्मार्त शैव वैष्णवादि मत । मेदाभेद व्यर्थ तर्कवाद ॥१३॥
संती सांगितलें तेचि आचरावें । व्हावें निज वैष्णवे ज्ञानें निज ॥१४॥
घेवों नयें तर्क दोषादि कल्पना । विचार वल्गना वाद शंका ॥१५॥
असो मलतैसे निंद्यही का नीच । परी योग्य तेंच करावयां ॥१६॥
श्रीगुरुंचे दास जगीं म्हणवावें । नाडले थोर थोर गर्वे अभिमानें ॥१७॥
म्हणें जनार्दन हे तें व्यर्थ आटी । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१८॥