१२
होवोनिया जगी योगिया शरण । करो नये अन्य गुरु मग ॥१॥
घेतां आणिकांचा चुकोनीही मंत्र । बुडोनी परत्र पतन होय ॥२॥
जाती ते दोघेही पतनी अक्षय । आकल्प उभय कुळासह ॥३॥
न होती तयांसी तारु हरी हर । मोगिती अघोर पुर्वजेशी ॥४॥
राजयोगी दावी निर्वानीचे सुख । योगीची तारक ब्रह्मादाता ॥५॥
म्हणो नये गुरुसी मायबाप बंधु । आप्त मित्र संबंधु लौकिक हा ॥६॥
माय बाप पतीनव्हती कोण एक । निर्वाणि तारक सदगुरुची ॥७॥
नाहीं गुरुवीण देवासीही ब्रह्मा । मजावा सप्रेम ब्रह्माभावें ॥८॥
म्हणे जनार्दन ब्रह्मभावे दाठी । उघडी भ्रमताटी एकनाथ ॥९॥