९
सदगुरुची सेवा करोनि संपुर्ण । करावें प्रसन्न सर्व भावें ॥१॥
कायावाचामनें जिवें प्राणें धनें । सबाह्म अर्पण सर्व स्वेशीं ॥२॥
ऐशा सेवेवीण होये मंत्र व्यर्थ । मेल्या नोहे प्राप्त खुण तेही ॥३॥
दिनि निशी नित्य एकांती लोकांती । वरी असो स्थिती भलत्याही ॥४॥
करावी सर्व सेवा ब्रह्माभावेम साच । विसरोनी नीच उत्तम हे ॥५॥
आप्त गणगोत घेवोत पै शंका । जावो प्राणही कां होवो कांहीं ॥६॥
जपावें अखंड श्रेगुरुचेचि नाम । वंदावे सप्रेम तयासची ॥७॥
सर्वस्वें सबाह्म सेवानीच दास्य । करावें अहर्निश श्रीगुरुचेचि ॥८॥
करावी श्रवण श्रीगुरुचीच किर्ति । पुजावें प्रेमे अती तारकाची ॥९॥
गावे चरित्रासी श्रीगुरुच्याचि मुखें । आणिक साधकें वर्णो नये ॥१०॥
व्हावें अंतर्बाह्म सर्वस्वें अर्पण । अखंड अनुदीन तारकांचि ॥११॥
श्रीगुरुसीच नित्य आचरावें सख्यं । मजावें आणिक सर्वभावें ॥१२॥
करितां भोगितां अखंड सतत भावें । सकळ भोगवावें श्रीगुरुसचि ॥१३॥
मावो नये अन्य घ्यावो नये अन्य । श्रीगुरु वाचोन ब्रह्मा तेंही ॥१४॥
घेवोनि शपथ श्रीगुरुरंगी नित्य । रंगवावी चित्त वृत्ति सर्व ॥१५॥
अर्पावा क्षणक्षणीं सकळ देह प्राण । आलिंगावे लीन व्हावें रुपीं ॥१६॥
मिळवावें वित्त श्रीगुरुसेववार्थची । भोगावे प्रपंची तारकाची ॥१७॥
वागावे एकची श्रीगुरुव्रतधर्मे । अन्य धर्म नेमे वर्जावे ते ॥१८॥
वाटे तेचि श्रीगुरु करो भोगो कांहीं । वाळावएं ब्रह्माही तयापुढे ॥१९॥
परि जीतमेल्या सोडो नये काहीं । श्रीगुरुसी कांहीं वंचो नये ॥२०॥
दव्डो नये पळ निमैअष सेवेवीण । होवोनि उत्तीर्ण देहे जीवें ॥२१॥
गुरुसेवे ऐसे नाहीची त्रिभुवनीं । ऐसें हें पुरणी वर्णीयेलें ॥२२॥
फेडितां खंडिती सकळही ऋण । परि गुरुऋण न खंडेची ॥२३॥
या लागी सेवावें अखंड तारका । लौकिक शास्त्र शंका त्यागोनिया ॥२४॥
बोधोनि सकळां करवावें हेची । नित्य श्रीगुरुची सर्व सेवा ॥२५॥
पसरोनि ओटी मागावी पै मीक्षा । महत्व कीर्ती आशा त्यागोनिया ॥२६॥
होवोनी या दीन करावी याचना । विनवावें जना सेवेसाठीं ॥२७॥
वैभव जीवीत चार्ही पुरुषार्थ । करावी तेणें नित्य एक सेवा ॥२८॥
गुरुसेवेसाठी ब्रह्माडही थोडें । नपुरे बापुडे इंद्रपद ॥२९॥
ऐसे अनन्य झाले तेचि उघ्घरिले । गुरुवीण गेलें घोर नर्फी ॥३०॥
तेथें भ्रमें मुढ वाहति ते गर्व । नेणोनि सेव द्रव्य स्वामिचें हें ॥३१॥
कैचें शिष्यपण सबाह्म अर्पण । व्यर्थ भणभण शब्दाचीच ॥३२॥
कैची श्रीगुरुठायीं परब्रह्मा भावना । अंतरी कल्पना मानव हें ॥३३॥
साच जे अनन्य करिती त्यांचे दास्य । अहनिशीं मोक्ष मुक्ती चार्ही ॥३४॥
नांदे वैकुंठेसी लक्ष्मीसह हरी । नित्य तया घरीं सदोदित ॥३५॥
दर्शने तयांच्या पावन देव होती । पापी उघ्घरती महादोषी ॥३६॥
मौनावला शेआष तयाचें महात्म्य । वर्णिता निगम भारती ही ॥३७॥
सेवावें तारका सबाह्मों सर्वेस्वें । घनें प्राणें जीवें सर्व देहें ॥३८॥
ऐसा होये त्यासी द्यावें कृपा घन । येरां गेल्या प्राण देवो नये ॥३९॥
जाय दिघलिया बुडोनी सकळ । होवोनि निर्फ्ळ श्रम सर्व ॥४०॥
आधी मद्य कुंभ निर्वाळिल्यावीण । घालीता पावन नोहे दुग्ध ॥४१॥
म्हणे जनार्दन न चले हातवाटी । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥४२॥