१६
गुरुसी शरण होतां करिती जे विघ्न । पाचती तेदरुण नरकी शेखी ॥१॥
घडती कोटी मात्रा अगम्या गमन । गोवघ भक्षण गोमासंदि ॥२॥
कोटी ब्रम्हहत्या पातकें अशेष । घदती तया दोष ब्रह्माडीचे ॥३॥
होय दग्ध पुण्य जन्मीचें अनंत । जाती नरकी नित्य कुळांसह ॥४॥
नोहे त्या सुटका मग होकां कोणी । बोधावें म्हणोनी संती जना ॥५॥
विसरोनि सुख करावें पर्यटण । लावावें वळवोन विश्व मार्गा ॥६॥
झटावें अक्षय जगाच्या कल्याणा । उपदेशावें जना नारी नरा ॥७॥
ओळखावें देही सकळी आत्मघन । होवोनि शरण योगियासी ॥८॥
आलीया करावी सत्य शरण कृपा । सकळं ह सोपा राजमार्ग ॥९॥
नसतां पुरुषां योगी अनुराग । द्यावा मंत्र योग स्त्रियांशुद्रां ॥१०॥
जरी नोह योग अभ्यास साधन । तरी सेवा क्षण सोडों नये ॥११॥
सोशिती काबाड प्रपंच प्रहर आठ । मानिती अघम कष्ट गुरुसेवे ॥१२॥
आचारिती दोष पातकें अगाध । गुरुसेवे खेद पचती नरकीं ॥१३॥
नव्हे शिष्य जंव नोहे समर्पण । पतन गुरुवीण जन्म वायां ॥१४॥
खंडलिया पळ निमिष गुरुसेवा । अंतरे तो देवा कल्पवरी ॥१५॥
माता पिता गोत्र कांता पती पुत्र । भोगिती अघोर पुर्वजेंशी ॥१६॥
नोहे त्या सुटका मग कल्पातीही । जाये कृपा तोही मंत्र वायां ॥१७॥
यालागी करावी नित्य गुरु सेवा । देह जीव मावा आर्पोनिया ॥१८॥
करी सेवा नित्य न करी योगाभ्यास । लाभे अंती त्यास ब्रह्मपद ॥१९॥
नेणोनि सुरनर प्रेमे ब्रह्मभावें । क्षणोक्षणीं आलिंगावें अर्पावा देह ॥२०॥
बैसोनि सन्निध एकांती बाजारी । करावी नीच बारी निर्लज्जेशी ॥२१॥
म्हणे जनार्दन उत्तरी कसवटाई । उघडी भ्रमताटी एकनाथ ॥२२॥