Get it on Google Play
Download on the App Store

१४

पाहो नये दोष योगियांचे गुण । ब्राह्म आचरण असो कांहीं ॥१॥

योगि तोचि ब्रह्मदेवाचाहि देव ॥ नोहेचि मानव मासे जरि ॥२॥

योगीयांचें कांही नकळे देवांही । प्राकृत नर कांई कवण तेथें ॥३॥

करी भोगी सर्व परी योगी मुक्त । न करी तरी सत्य करी सर्व ॥४॥

योगीयाचे भोग चरित विषय कर्म । अवघे परब्रह्मा तारकची ॥५॥

नकरी योगी स्नान संध्या अनुष्ठान । स्पर्शे करी पावन ब्रह्मासिही ॥६॥

नलगे अविश्वास शंकेसी कारण । योगी तोचि पुर्ण परमात्मा ॥७॥

ताराया जढमुढां श्रीहरीं रुपें योगी । अवतरे युगायुगीं आन नाहीं ॥८॥

भुलुनि घनगुणविद्यारुपमदें । प्रवर्तति निन्दें भावोनि नर ॥९॥

यालागी करावा आधी बोध जगा ॥ प्रशंसावे योगा झटुनि नित्य ॥१०॥

उद्धारावे विश्वातरीच देव प्राप्त । लाभे परहित पुण्यें देहीं ॥११॥

म्हणे जनार्दन ब्रह्म पाठींपोटीं । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१२॥