Android app on Google Play

 

आरती अनसूयेची - जय शिखरेश्‍वरि भगवंते । भ...

 

जय शिखरेश्‍वरि भगवंते । भवानी अनसूये, माते ॥धृ०॥

कुंकुम-कंकण-सौभाग्ये । अखंडित मंडितविमलांगे

शुभासनिं शोभसि अनुरागें । जडितमणि मखर पद्मरागें

पद्मजात्मज मानसरंगे । गुरु दत्तात्रय माय गंगे

(चाल) महासति देवहुति-तनुजा

कपिल-महामुनिची तूं अनुजा

भवाश्रमिं सिद्धि-तिष्ठती रिद्धि-विपुल समृद्धी

षड्‌गुणालंकृत श्रीमंते । कृपा करि अनुसूये, माते ॥१॥

चित्कलानंदे, अर्धमात्रे । जय जगजननी जगधात्रे

सगुण रुप सुंदर सुपवित्रे । सदा सुप्रसन्न पद्मनेत्रे

ताम्रध्वज तोरण नक्षत्रें । डोलती शिरिं चामर-छत्रें

(चाल) सदानंदोत्सव दिनरात्रीं

वाजती चौघडे वाजंत्री

वेदविद भाट करति बोभाट दाविती वाट

या षट्‌पद पदपद्मातें । कृपा करि अनुसूये, माते ॥२॥

वसति श्रीसिंहाद्रिपकुटीं । सरिता सर तीर्थें कोटी

देवऋषि-हरिहर-परमेष्ठी । अप्सरा अमर तुझ्यासाठीं

गाति गंधर्व कीर्ति मोठी । अशि असे म्हणती वैकुंठीं

(चाल) सिद्ध चिंतामणि कामाक्षी

देव देवेश्‍वर सर्वसाक्षी

महाकालिका-कोरिभूमिका-प्रकट रेणुका

प्रणिता पुण्य संगमातें । कृपा करि अनसूये, माते ॥३॥

भवाटविं जिव झाला कष्टी । विलोकुनि पहा अमृतदृष्टीं

यथा ऋतुकाळीं जळवृष्टी । करोनी करि सुफलित सृष्टी

चालवी धर्म-यज्ञ-इष्टी । देह आरोग्य तुष्टिपुष्टी

(चाल) विष्णुस्वामीची प्रार्थना ही

दयाळे ! अन्य स्वार्थ नाहीं

भेट मज देइ-पाव लवलाही-दिनाचे आई

कृपामृत पाजि कृपावंते । कृपा करि अनसूये, माते॥४॥

 

इतर आरती संग्रह

भगवान दादा
Chapters
दशावताराची आरती - आरती सप्रेम जय जय विठ्ठल ...
मनोबोधाची आरती - वेदांचे जें गुह्य शास्त्र...
श्रीरामदासस्वामींची आरती - ओंवाळू आरती सद्गुरु रामदा...
विष्णूची आरती - ओम जय जगदिश हरे स्वामी जय...
नवनाथांची आरती - जय जय नवनाथांचा । जय ज्ञा...
आरती चंद्राची - जयदेव जयदेव जय चिन्मय चंद...
आरती पंचायतनाची - जयदेव जयदेव जय पंचायतना ॥...
शेजार्ती - आतां स्वामी सुखें निद्रा ...
संतांची आरती - गुण आणि गंभीर रणधीर । तया...
संतांची आरती - क्षार उदक देउनी मधुरता आल...
शेजारत्या
शेजारती विष्णूची - सुखें निद्रा करी आतां स्व...
आरती विष्णूची - जय जय लक्षुमिकांता शेषशाय...
आरती लक्ष्मीकांताची - जयदेवजयदेव जय लक्ष्मीकांत...
आरती भैरवाची - जयदेव जयदेव जय भरवराया । ...
आरती रामदासाची - आरती रामदासा नित्यानंद वि...
आरती कृष्णेची - जयदेव जयदेव जय माय कृष्णे...
आरती यतीची - जयजय वो यतिवर्या सच्चित् ...
आरती गीतेची - जयदेव जयदेव जय भगवद्गीते ...
आरती सरस्वतीची - जयदेव जयदेव जय अद्वयमूर्त...
आरती गुरुची
आरती ज्ञानोबाची - जयजयाची ज्ञानदेवा आदि देव...
आरती सूर्याची - जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्...
श्रीज्ञानेश्वरांची आरती - (१) होतां कृपा तुझी पशु ब...
श्रीतुकारामांची आरती - आरती तुकारामा । स्वामि सद...
श्रीजानकीची आरती - कारुण्यमृतसरिते, कोटिसुगु...
श्रीएकनाथांची आरती - भानुदासाच्या कुळीं महाविष...
रामदासांची आरती - आरती रामदासा । भक्त विरक्...
शनैश्चराची आरती - जय जय श्रीशनिदेवा ॥ श्री ...
आरती अधिकमासाची - या अधिकमासी श्रीपुरुषोत्त...
आरती अधिकमासाची - ओवाळू आरती । आता पुरुषोत्...
नागनाथ आरती - मंगलमूर्ती मंगल वदन त्रिन...
आरती श्रीसत्याम्बेची - जयदेवी जयदेवी जय श्रीसत्य...
श्री सत्यदत्त आरती - करितों प्रेमें तुज नीरांज...
आरती गीतेची - जय देव जय देवी जय भगवद्‌ग...
आरती चंद्राची - जय देव जय देव जय श्रीशशिन...
आरती कालभैरवाची - उभा दक्षिण पंथे काळाचा का...
आरती वटसावित्रीची - अश्वपती पुसता झाला । नार...
आरती संतांची - आरती संतमंडळी । हातीं घ...
आरती मोरया गोसाव्यांची - धन्य धन्य योगी सर्व जगांत...
उनकेश्‍वराची आरती - जय जय श्रीगुरुशरभंगा । आर...
सिद्धेश्‍वराची आरती - जयदेव , जयदेव , जय सिद्धे...
आरती काळभैरवाची - जय जय श्रीशिवकाशीविश्‍वेश...
आरती अनसूयेची - जयदेवी, जयदेवी, जय देववंद...
आरती अनसूयेची - जय शिखरेश्‍वरि भगवंते । भ...
आरती अनसूयेची - जयजय आदिमाये , अनुसूये !...
आरती जमदग्नीची - जयदेव, जयदेव, जय दक्षिणके...
आरती भार्गवरामाची - जयदेव जयदेव जय भार्गवरामा...