Get it on Google Play
Download on the App Store

उनकेश्‍वराची आरती - जय जय श्रीगुरुशरभंगा । आर...

जय जय श्रीगुरुशरभंगा । आरति उनकेश्‍वर-लिंगा ॥धृ०॥

भूमंडळीं उनकेश्‍वर क्षेत्र । पुण्यस्थळ पावन सुपवित्र

सन्मुनि वसति दिवस-रात्र । जपति शिवपंचाक्षरि मंत्र

गंधाक्षता, बिल्वपत्र । अर्पितां प्रसन्न त्रिनेत्र

(चाल) भक्‍तजन पुजिति नीळकंठा

गर्जती शंख, दुंदुभि, घंटा

महोत्सव पर्व----गाति गंधर्व----स्तविति सुर सर्व

उजळुनि कर्पूर, दीप रांगा । ओवाळिती कर्पुरांगा ॥१॥

निकट अर्धांगि शैलबाळी । विराजे अर्धचंद्रमौळी

नंदि विरभद्र भद्रकाळी । नाचती गण सायंकाळीं

उष्ण जळिं करितां आंघोळी । होय कुळपातकाचि होळी

(चाल) भ्रमत अवधूत दत्त लहरी

फिरत शुक नारदाचि फेरी

उडे भजनरंग---सदा सत्संग---डुल्लति भुजंग

पूर्वमुखाऽमृत जळ-तरंगा । प्रदक्षिणिं वाहे बाणगंगा ॥२॥

सुरभिसम विपुल वृषभ-गाई । सुशोभित वनचंपक-जाई

कल्पद्रुम-लता-आमराई । वाहती पाट ठाइं ठाई

येति वट-अटन करित पायीं । राम-सौमित्र-सिताबाई

(चाल) अखंडित उष्ण शितळ पाणी

करि कोदंड चापपाणी

सगुण गंभीर---महारणधीर---बाप रघुवीर

सनातन भक्‍त-कामिं जागा । प्रकट करि पुण्याश्रम जागा ॥३॥

नमस्ते विश्‍वंभरभरणा, करुणानिधे, करी करुणा

निवारी जन्ममरण भ्रमणा, दयाळा, श्रीपार्वतिरमणा

दिनाच्या दुरित दुराचरणा, नाठवी दावि सुखद चरणां

(चाल) विष्णूस्वामि म्हणे स्वानंदें,

निरंतर भजनीं वासना दे

शुंभशंकरा----प्रभो दशकरा----प्रमोदित करा,

प्रबोधी ज्ञानपदाभंगा, जयजय उनकेश्‍वर-लिंगा ॥४॥

इतर आरती संग्रह

भगवान दादा
Chapters
दशावताराची आरती - आरती सप्रेम जय जय विठ्ठल ... मनोबोधाची आरती - वेदांचे जें गुह्य शास्त्र... श्रीरामदासस्वामींची आरती - ओंवाळू आरती सद्गुरु रामदा... विष्णूची आरती - ओम जय जगदिश हरे स्वामी जय... नवनाथांची आरती - जय जय नवनाथांचा । जय ज्ञा... आरती चंद्राची - जयदेव जयदेव जय चिन्मय चंद... आरती पंचायतनाची - जयदेव जयदेव जय पंचायतना ॥... शेजार्ती - आतां स्वामी सुखें निद्रा ... संतांची आरती - गुण आणि गंभीर रणधीर । तया... संतांची आरती - क्षार उदक देउनी मधुरता आल... शेजारत्या शेजारती विष्णूची - सुखें निद्रा करी आतां स्व... आरती विष्णूची - जय जय लक्षुमिकांता शेषशाय... आरती लक्ष्मीकांताची - जयदेवजयदेव जय लक्ष्मीकांत... आरती भैरवाची - जयदेव जयदेव जय भरवराया । ... आरती रामदासाची - आरती रामदासा नित्यानंद वि... आरती कृष्णेची - जयदेव जयदेव जय माय कृष्णे... आरती यतीची - जयजय वो यतिवर्या सच्चित् ... आरती गीतेची - जयदेव जयदेव जय भगवद्गीते ... आरती सरस्वतीची - जयदेव जयदेव जय अद्वयमूर्त... आरती गुरुची आरती ज्ञानोबाची - जयजयाची ज्ञानदेवा आदि देव... आरती सूर्याची - जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्... श्रीज्ञानेश्वरांची आरती - (१) होतां कृपा तुझी पशु ब... श्रीतुकारामांची आरती - आरती तुकारामा । स्वामि सद... श्रीजानकीची आरती - कारुण्यमृतसरिते, कोटिसुगु... श्रीएकनाथांची आरती - भानुदासाच्या कुळीं महाविष... रामदासांची आरती - आरती रामदासा । भक्त विरक्... शनैश्चराची आरती - जय जय श्रीशनिदेवा ॥ श्री ... आरती अधिकमासाची - या अधिकमासी श्रीपुरुषोत्त... आरती अधिकमासाची - ओवाळू आरती । आता पुरुषोत्... नागनाथ आरती - मंगलमूर्ती मंगल वदन त्रिन... आरती श्रीसत्याम्बेची - जयदेवी जयदेवी जय श्रीसत्य... श्री सत्यदत्त आरती - करितों प्रेमें तुज नीरांज... आरती गीतेची - जय देव जय देवी जय भगवद्‌ग... आरती चंद्राची - जय देव जय देव जय श्रीशशिन... आरती कालभैरवाची - उभा दक्षिण पंथे काळाचा का... आरती वटसावित्रीची - अश्वपती पुसता झाला । नार... आरती संतांची - आरती संतमंडळी । हातीं घ... आरती मोरया गोसाव्यांची - धन्य धन्य योगी सर्व जगांत... उनकेश्‍वराची आरती - जय जय श्रीगुरुशरभंगा । आर... सिद्धेश्‍वराची आरती - जयदेव , जयदेव , जय सिद्धे... आरती काळभैरवाची - जय जय श्रीशिवकाशीविश्‍वेश... आरती अनसूयेची - जयदेवी, जयदेवी, जय देववंद... आरती अनसूयेची - जय शिखरेश्‍वरि भगवंते । भ... आरती अनसूयेची - जयजय आदिमाये , अनुसूये !... आरती जमदग्नीची - जयदेव, जयदेव, जय दक्षिणके... आरती भार्गवरामाची - जयदेव जयदेव जय भार्गवरामा...