आरती कालभैरवाची - उभा दक्षिण पंथे काळाचा का...
उभा दक्षिण पंथे काळाचा काळ ।
खङ्ग, चक्र वाटी हाती त्रिशुळ ।
गळा शोभे त्याच्या स्फटीकाचीं माळ
आपुलीयादासाचा करतो सांभाळ ।
जयदेव जयदेव जयक्षेत्रपाळा ।
आरती ओंवाळूं तुझीया मुखकमळ ॥
जय देव जय. ॥
प्रथम काशिपुरी रहीवासी केला ।
दैत्य वधावया क्रोध उपजला ।
काळास मर्दून निष्पाप केला ।
काळभैरव असे नाम पावला ॥ जय. ॥
पूर्वी सुवर्णाची होती सुनगरी ।
तेथे भैरव राज आणि योगेश्वरी ।
रीद्धीसिद्धी त्याच्या अष्टीकानारी ।
ध्यातो त्रिंबकराज निशिदिनी अंतरी ॥ जय. ॥