फुलपाखराचं गाणं....!
निशिगंधा संजय उपासनी
( बी.एस.सी.बायोटेक्नॉलॉजी )
एक रंगीत फुलपाखरू,
एकटंच फिरतं....
या झाडावरून त्या झाडावर,
सारखं फिरत बसतं.....
झाडाच्या त्या फांदीवर.....
फांदीवरून फुलावर.....
भिर भिर भिर भिर भिरभिरतं.....
आणि हे फूल माझं मित्र आहे....
असं गाणं सारखं गुणगुणतं.....!