Get it on Google Play
Download on the App Store

माध्यमांतर सीरिज भाग ३

निमिष सोनार

(एपिक चॅनल: धर्मक्षेत्र) कर्ण

मग दुर्योधनावर भीष्म आरोप करतात की त्याने कर्णाशी मैत्री फक्त यासाठी केली की त्याला एक असा योद्धा हवा होता जो अर्जुनाला हरवू शकेल. म्हणजे स्वार्थासाठी मैत्री! आणि कर्णाचे दुर्योधनाप्रती काही कर्तव्य आहे असे म्हणता येत नाही कारण त्यांची मैत्रीच मुळात स्वार्थावर आधारित होती...

मध्येच दुर्योधन त्यांना तोडून खंडन करतो पण..

चित्रगुप्त दोघांना मध्येच थांबवून म्हणतात की, कर्णावर याआधी जो आरोप होता तो आधी पाहू! त्याने आपली आई आणि पाच भाऊ यांचेप्रती जे त्याचे कर्तव्य होते ते पाळले नाही, पण जर का पांडव कुंती यांनीच त्याला जाणूनबुजून त्यांच्यापासून दूर ठेवले होते तर मग कर्णाचे त्यांचेप्रती काही कर्तव्य उरत नाही...

म्हणून त्या आरोपाचे खंडन करून तो आरोप चूक आहे असे चित्रगुप्त जाहीर करतात.

पुढे चित्रगुप्त सांगतात: "आता पाहू कर्णाचे दुर्योधनाप्रती असलेले कर्तव्य! भीष्माचार्यच्या म्हणण्यानुसार कर्णाचे दुर्योधनाप्रती काही कर्तव्य नव्हतेच कारण कर्णाला अंग देशाचा राजा त्याला बनवण्याची प्रक्रियाच मुळात चूक होती तर मग कर्ण दुर्योधचे उपकार फेडण्यासाठी जे कर्तव्य करत होता त्याला काहीही अर्थ नाही! आता कर्ण अंगराज असो की नसो पण प्रश्न हा आहे की कर्णाने दुर्योधनासोबत मैत्री काय फक्त स्वार्थासाठी केली? हाच पुढचा आरोप आहे कर्णावर की त्याने दुर्योधनाशी मैत्री फक्त अर्जुनाला पराजित करण्यासाठी केली!"

कर्ण: "महाराज, हे असत्य आहे!"

भीम: "कर्ण, हे सत्य आहे. आमच्या दिक्षांत समारंभात तू ज्या पद्धतीने अर्जुनाला आव्हान दिले होतेस त्यावरून हे स्पष्ट होते की तुझ्या आयुष्याचा उद्देशफक्त अर्जुनाला हरवणे हाच होता!"

दुर्योधन: "भीमा, तुला हजारदा सांगितले आहे की माझ्या आणि कर्णाच्या मैत्रीचा उपहास करण्याचा तुला काहीही अधिकार नाही!"

गांधारी: "पुत्र, भीम योग्य तेच सांगतोय!"

दुर्योधन: "माते, हे काय सांगते आहेस तू?"

गांधारी: "हो दुर्योधन मी बरोबर सांगते आहे, कर्ण, तू एक दुर्योधनाचा चांगला मित्र असल्याची बतावणी करतोस ना? मग एक सांग, युद्ध झाल्यावर दुर्योधनाला नुकसान  होईल तसेच कृष्ण ज्या पक्षात आहेत त्याचाच विजय होईल, हे तुला माहीत होते ना? मग तू दुर्योधनाला परावृत्त का नाही केलेस युद्धापासून?"

कर्ण शांत... निरुत्तर नाही पण भावनावश होतो...  म्हणून शब्द निघत नाहीत...

सगळे म्हणतात की तू शांत राहिलास याचा अर्थ तुला हा आरोप मान्य आहे!!

मग चिडून कर्ण म्हणतो: "चित्रगुप्त महाराज, मी दुर्योधनाला युद्धपासून परावृत्त केले नाही कारण मी त्याला गमावू इच्छित नव्हतो महाराज! मला सांगाइथे बसलेले सगळेजण जन्मापासून जाणतात की ते कोण आहेत? पण मला मात्र तरुण  होईपर्यंत मी कोण आहे मला माहित नव्हते. नेहमी वाटायचे की मी जर सूतपुत्र आहे तर माझ्यात क्षत्रिय गुण का? मग कळले की कुणीतरी मला जन्म दिला आणि त्यागले. हे लक्षात घ्या की, दिक्षांत समारंभात मी फक्त माझे क्षत्रिय गुण लोकांना दाखवण्यासाठी गेलो होतो. पण गुरू द्रोण आणि कृपाचार्य यांनी मला स्पर्धेत भाग घेऊ दिला नाही. कुंतीनंतर पुन्हा एकदा कुणीतरी मला स्विकारू शकत नव्हते. तशातच माझा मित्र दुर्योधन माझे भाग्य बनून आला. माझ्यासारख्या अनाथाला घर मिळाले दुर्योधनाच्या हृदयात!"

भीम: "मिळालं का उत्तर आता भीष्म महाराज?"

भीष्म चूप आणि निरुत्तर!!

मग कर्ण जुना एक प्रसंग सांगतो....

फ्लॅशबॅक सुरू:

दुर्योधन, दु:शासन आणि कर्ण बोलत असतात.

दु:शासनला दुर्योधनाने विचारल्यावर तो युद्ध नक्की करण्याचा सल्ला भावाला देतो, नंतर मग दुर्योधन कर्णाला विचारतो...

दुर्योधन: "मित्र कर्ण! कृष्णाचा संधीचा प्रस्ताव मी नाकारला आहे पण सगळेच म्हणतात की युद्ध करू नकोस. सगळे म्हणत आहेत तर ते योग्यच असेल पण कर्ण तू सांग युद्ध करू की नको? तू सांग कर्णा, माझ्या जागी असतास तर काय केले असतेस?"

कर्ण: "आतापर्यंत तू जे नाही करायला हवे होते, तेही केलेस आणि आता युद्धाच्या वेळेस विचारतोस की युद्ध करू का? मग मी सांगतो की नको करुस! भाऊ भावाशी लढून काय मिळणार आपल्याला? नको करुस युद्ध!"

दुर्योधन: "पण युद्ध जर झाले नाही तर तुला अर्जुनाशी लढायला पण मिळणार नाही मित्रा! तुझी धनुष्यकला तुला जगासमोर सिद्ध करायला मिळणार नाही, लक्षात ठेव!"

कर्ण: "दुर्योधन, माझ्या धनुष्यापेक्षा मला माझा मित्र म्हणजे तू प्रिय आहेस. तुला युध्दाबद्दल आणि आपल्या विजयाबद्दल शंका असेल तर नकोच ते युद्ध! आणि राहिली गोष्ट माझी धनुर्विद्या सिद्ध करण्याची! तर, मला माहिती आहे की मी नक्कीच अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर आहे, त्यासाठी मला सिद्ध करायची गरज नाही!"

दुर्योधन: "पण मित्रा युद्ध टाळून पांडवांना आपल्यासोबत उठता बसता समोर बघून तसेच त्यांना आपल्यावर राज्य करताना बघून आपले उर्वरित आयुष्य घालवण्यापेक्षा तर युद्ध केलेलं परवडलं रे!"

कर्ण: "तू मला सल्ला मागितलास आणि मी दिला! पण मित्रा, शेवटी तू जे म्हणशील ते! तुला वाटतंय ना युद्ध करावसं? मग करूया आपण युद्ध!! मी सदैव तुझ्याच सोबत राहीन!"

फ्लॅशबॅक समाप्त!

चित्रगुप्त: "या सर्व एकंदरीत स्पष्टीकरणावरून आणि चर्चेवरून दिसून येते की कर्णावरचा हा आरोप आता चुकीचा सिद्ध झाला की त्याने दुर्योधनाशी स्वार्थासाठी मैत्री केली! उलट त्याने दुर्योधनाप्रती असलेले मित्रत्वावचे कर्तव्य चांगल्या रितीने पार पाडले!"

(कर्ण एपिसोड क्रमशः)

आरंभ: एप्रिल - मे २०१८

संपादक
Chapters
वर्ष १, अंक ४ संपादकीय सुट्टीचे नियोजन चला, हसूया!! उन्हाळ्याच्या सुट्टीत कोठे जाण्यास आवडेल? बळूद आणि पेव हॅलोऽ मी मोनी बोलतेय...! देवघर - मला स्फूर्ती देणारा पवित्र कोपरा! चांदण्या रात्रीत चंद्राच्या उजेडातील वाटचाल....! मी आहे सलोनी! गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी वृक्षवल्ली जीवन आमुचे...! रक्तदान जीवनदान..!! प्रिस्क्रिप्शन थरारक अनुभव: अकस्मात...!! माध्यमांतर सीरिज भाग ३ शालिमार अर्थक्षेत्र भाग ४ - डी मॅट अकाऊंट सिद्धेश देवधर यांची व्यंगचित्रे १ सिद्धेश देवधर यांची व्यंगचित्रे २ शेंगदाणे-मिरचीचा तव्यावरचा चवदार ठेचा! बडबडगीत : अंग घुसळे घुसळे....! बडबडगीत : अजून झोका पारंबीला......! बडबडगीत : खोपा.....! बडबडगीत : गावाकडचे हरीण...! बडबडगीत : जादूचे स्वप्न........! बडबडगीत : जादूच्या गोष्टी.....! चित्रकविता - पर्णहीन.. चित्रकविता - इवलासा जीव चित्रकविता - चिऊताई चित्रकविता - झपझप पडती.. चित्रकविता - जगन्नियंत्याच्या... परी गं परी पाढे गाती गाणे आजीची गोष्ट फुलपाखराचं गाणं....! उखाणे