चित्रकविता - इवलासा जीव
सविता कारंजकर
इवलासा जीव तुझा
रंगसंगती सुरेख..
बसलास तू पानांवरी
पसरूनी पंख...
पान खुलले हसले
मग हळूच पुसले..
रंग तू उधळले..
परागकण तू लुटले..
सांग एवढे करून
तुला काय गवसले?
जीव गालात हसला..
मनोमनी सुखावला..
म्हणे देत देत घेणा-याच्या
मोदातला मोद
मी लुटला....