चित्रकविता - चिऊताई
सविता कारंजकर
चिऊताई चिऊताई अंगणात येत रहा...
चिवचिवाटानं अंगण खुलवत रहा..
चिऊताई चिऊताई अगं तू येत रहा...
बीजं नवनवीन रूजवत रहा...
रुजलेली बीजं अंकुरतील..
झाडं फळाफुलांनी बहरतील...
त्या झाडांवर नवनवी घरटी बनवत रहा...
चिऊताई चिऊताई तू येत रहा..
आम्ही ही तुझं स्वागत करु..
तुझ्या दाणापाण्याची सोय करू..
सिमेंटच्या जंगलातलं तुझं घरटं आम्ही जतन करू
चिऊताई तुला कवितांमध्ये पुस्तकात कोंडणार नाही..
चिऊताई तू येत रहा..
आमच्या पुढच्या पिढीला घास भरवायला.चिऊताई, तू येत रहा..