आजीची गोष्ट
पुजिता संजय उपासनी
माझ्या गावात गावात
आजी आजोबा राहती
उन्हाळ्याच्या सुटीमध्ये
त्यांच्या भेटी हो घडती //१//
आजी,काका,काकू,दादा
सारे विचारती मला
काय म्हणतो अभ्यास
सांग सईबाई मला //२//
आजी म्हणते मजला
काय चालले रे बाळा
मग आजीला सांगते
सांग गोष्ट आधी मला //३//
उन्हाळ्याच्या सुटीमध्ये
दिवाळीच्या सुटीमध्ये
जाते गावात गावात
येते गम्मत गम्मत //४//
माझ्या आजीकडे आहे
एक जादूची पोतडी
किती तरी गोष्टी त्यात
जादू,राक्षस नि परी //५//