पाढे गाती गाणे
अरुण वि.देशपांडे - पुणे
मो-९८५०१७७३४२
एक दोन तीन चार
पोरं करती मस्ती फार
पाच सहा सात आठ
हुशार मुलांची मान ताठ
नऊ दहा अकरा बारा
पुस्तके वह्यांचा हा पसारा
तेरा चौदा पंधरा सोळा
अभ्यास करा मग खेळा
सतरा अठरा एकोणीस वीस
भुकेने झाला जीव कासावीस