लक्ष्मणाच्या प्राणांचे रक्षण
राम आणि रावणाच्या युद्धा दरम्याने जेव्हा रावणाचा पुत्र मेघनाद याने शक्तीबाणाचा प्रयोग केला तेव्हा लक्ष्मणासहित कित्येक वानर मूर्च्छित होऊन पडले. जाम्बुवंताच्या सांगण्यावरून हनुमान संजीवनी बूटी आणायला द्रोणाचल पर्वताकडे गेला. परंतु त्याला संजीवनी ओळखता येईना, तेव्हा त्याने पर्वताचा एक भागच उचलला आणि परत येण्यास निघाला. वाटेत त्याला कालनेमी राक्षसाने अडवले आणि युद्धासाठी ललकारले. हा राक्षस रावणाचा अनुयायी होता. रावणाच्या सांगण्यावरूनच त्याने हनुमानाचा रस्ता अडवला होता.परंतु रामभक्त हनुमानाने त्याचे कपट लगेचच ओळखले आणि त्याचा वध केला.