रामाला सीतेची बातमी दिली
शेपटी विझवून पुन्हा छोटे रूप धारण करून हनुमान सीता मातेच्या समोर हात जोडून हजर झाला आणि तिची चूडामणी निशाणी घेतली आणि समुद्र ओलांडून परत आला आणि त्याने वानरांना भुभुःकार (हर्षध्वनी) ऐकवला.हनुमानाने रामाच्या समोर जाऊन त्याला सांगितले, "हे नाथ! परत येताना त्यांनी (सीता मातेने) मला चूडामणी काढून दिला." रामाने तो घेतला आणि हनुमानाला छातीशी कवटाळले. हनुमान मग म्हणाला, "हे नाथ! दोन्ही डोळ्यात अश्रू घेऊन माता जानकीने मला काही गोष्टी सांगितल्या." आणि मग हनुमानाने जानकीची विरहगाथा ऐकवली जी ऐकून रामाच्या डोळ्यांत देखील अश्रू तरळले.