Get it on Google Play
Download on the App Store

सुरसा सोबत सामना


https://s-media-cache-ak0.pinimg.com/736x/aa/90/22/aa9022389bda2c6ae2feb782013abc2a.jpg

समुद्र पार करत असताना त्याचा सामना सुरसा नावाच्या नागमातेशी झाला जिने राक्षसी रूप धारण करून ठेवले होते. सुरसाने हनुमानाला अडवले आणि तुला मी खाणार असे सांगितले. खूप समजावून देखील ती ऐकेना, तेव्हा हनुमानाने सांगितले की ठीक आहे, तू मला खा. हनुमानाला खाण्यासाठी जसे सुरसा आपले तोंड उघडू लागली, तसे हनुमानाने आपले शरीर मोठे करण्यास सुरुवात केली. जसजसे सुरसा आपले तोंड वाढवत जात होती, हनुमान देखील आपले शरीर मोठे करत जात होता. नंतर अचानक हनुमानाने आपले शरीर एकदम लहान केले आणि पटकन सुरसाच्या मुखातून तिच्या पोटात प्रवेश केला आणि तसेच पटकन तो मुखातून बाहेर देखील आला. हनुमानाच्या या बुद्धी चातुर्यामुळे सुरसाने प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला तसेच त्याच्या सफलतेसाठी शुभेच्छा दिल्या.