Get it on Google Play
Download on the App Store

जेव्हा गिळला सूर्य

एका वेळची गोष्ट आहे, माता अंजनी हनुमानाला कुटीत झोपवून कुठेतरी बाहेर गेली होती. थोड्या वेळाने जेव्हा छोट्या हनुमानाला जाग आली, तेव्हा त्याला फार भूक लागली होती. तितक्यात आकाशात त्याला चमकणारे भगवान सूर्य दृष्टीस पडले. हनुमानाला वाटले की ते कोणतेतरी लाल-लाल गोड रसाळ फळ आहे. बस्स. ते फळ तोडण्यासाठी हनुमान त्याच्या दिशेने उडू लागला. जेव्हा पवन देवाने हे पहिले तेव्हा त्याने देखील हनुमानाचे सहाय्य करण्यासाठी वेगाने वारे वाहवले.


http://ritsin.com/wp-content/uploads/2014/04/Young-Hanuman-and-Lord-Surya-sun.jpg

हनुमानाने सूर्यदेवाच्या निकट जाऊन त्यांना पकडून आपल्या मुखात ठेवले. तो दिवस सूर्य ग्रहणाचा होता. राहू सूर्याला ग्रासण्यासाठी त्यांच्या जवळ पोचला होता. त्याला पाहून हनुमानाला वाटले की कदाचित हे देखील एखादे काळे फळ आहे आणि तो त्याच्या दिशेने झेपावला. कसाबसा जीव वाचवून राहू तेथून पळून गेला.

पळत जाऊन राहुने इंद्रदेवाकडे या गोष्टीची तक्रार केली. त्याने सांगितले की आज जेव्हा मी सूर्याला ग्रासण्यासाठी त्यांच्याकडे गेलो तेव्हा मी पाहिले की कोणी दुसऱ्याच व्यक्तीने त्यांना गिळून खाऊन टाकले. माहित नाही तो कोण होता!

राहूचे सांगणे ऐकून इंद्रदेव देखील भयभीत झाला आणि राहुला घेऊन सुर्यादेवाकडे निघाला. हनुमानाने पुन्हा जेव्हा राहुला पाहिले तेव्हा त्याने गरमागरम सूर्यदेवाला सोडून पुन्हा राहूवर झेप घेतली. राहुने घाबरून जाऊन इंद्राला हाका मारल्या. घाबरल्यामुळे इंद्राला देखील नक्की काय करावे हे समजत नव्हते. हनुमानाने जेव्हा ऐरावतावर विराजमान इंद्राला पहिले तेव्हा त्याला वाटले की हे कोणतेतरी पांढरे फळ दिसते आहे. आता हनुमान राहुला सोडून इंद्राकडे झेपावला, तेव्हा घाबरून जाऊन इंद्राने हनुमानावर वज्राने प्रहार केला. इंद्राचे वज्र हनुमानाच्या हनुवटीला लागले ज्यामुळे तो एका पर्वतावर जाऊन पडला आणि त्याची डावी हनुवटी मोडली.

हनुमानाची ही अवस्था बघून पवन देवाला क्रोध अनावर झाला. त्याने त्याच क्षणी आपली गती रोखली. त्यामुळे कोणताही प्राणी, वृक्ष श्वास घेऊ शकले नाहीत आणि सार्वजण अत्यंत पीडेने तडफडू लागले. अशा स्थितीत ब्राम्हदेवासाहित सर्व सूर - असुर, यक्ष, किन्नर इत्यादी सार्वजण वायुदेवाकडे गेले. वायुदेव बेशुद्ध हनुमानाला मांडीवर घेऊन उदास बसला होता. जेव्हा ब्रम्हदेवाने हनुमानाला शुद्धीवर आणले, तेव्हाच मग प्रसन्न होऊन वायुदेवाने पुन्हा सृष्टीमध्ये वायूचा संचार केला. तेव्हा ब्रम्हदेवाने वरदान दिले की कोणतेही शस्त्र हनुमानाचे शरीर छेदू शकणार नाही. सूर्यदेवाने सांगितले की मी याला माझ्या तेजातला शतांश देतो. वरूण देवाने सांगितले की माझा पाश आणि जल यांच्यापासून हा बालक सदैव सुरक्षित राहील. यमदेवाने अवध्य आणि निरोगी राहण्याचा आशीर्वाद दिला. याक्षाराज कुबेर, विश्वकर्मा इत्यादी देवतांनी देखील अमोघ वरदाने दिली.

इंद्राने म्हटले की याचे शरीर वज्रापेक्षा देखील कठीण असे बनेल आणि माझ्या वज्राचा देखील याच्यावर कोणताही प्रभाव पडणार नाही. याची हनुवटी वाज्रामुळे तुटली होती, त्यामुळे आजपासून याचे नाव हनुमान असे पडले.