Get it on Google Play
Download on the App Store

लंकादहन


http://images.jagran.com/naidunia/lanka-dahan_2015311_17345_11_03_2015.jpg

रामाची स्तुती ऐकून रावणाचा संताप अनावर झाला आणि त्याने शिक्षा फर्मावली, ज्या शेपटीच्या जोरावर हा बसला आहे, त्याच्या त्याच शेपटीला आग लावण्यात यावी. जेव्हा विना शेपटीचा हा वानर आपल्या प्रभूकडे जाईल, तेव्हा त्याचा प्रभू देखील इथे येण्याचे धाडस करणार नाही. शेपटीला आग लागलेली पाहताच हनुमान लगेचच एकदम छोट्या रूपाचा झाला. बंधनातून मुक्त होऊन तो गच्चीवर चढून बसला. मग त्याने आपले विशालकाय रूप धारण केले आणि अट्टाहासाने रावणाचा महाल जाळू लागला. मग एकामागून एक घरे जाळायला सुरुवात केली. त्याला बघून लांकावासी भयभीत झाले. पाहता पाहता लंका जळू लागली आणि लंकेत भयाची लाट पसरली. हनुमानाने एका क्षणात सर्व नगर जाळून टाकले. फक्त बिभीषणाचे घर जाळले नाही. लंका पेटवल्यानंतर तो समुद्रात उतरला.