समुद्र ओलांडणे
सर्वांत अगोदर वालीचा पुत्र अंगद याला समुद्र ओलांडून लंकेला जायला सांगण्यात आले होते, परंतु अंगद म्हणाला की मी समुद्र ओलांडून तर जाऊ शकेन, परंतु पुन्हा परत येण्याची क्षमता माझ्या तेव्हा उरणार नाही. मी परतण्याचे वचन देऊ शकणार नाही. तेव्हा मग जाम्बुवंताने आठवण करून दिल्यावर हनुमानाला आपल्या शक्तीचे स्मरण झाले आणि केवळ दोन उड्या मारून त्याने समुद्र पार केला.