Android app on Google Play

 

मेघनादाशी युद्ध

 


http://i1.dainikbhaskar.in/thumbnail/655x588/web2images/www.dailybhaskar.com/2015/11/03/1_1446557250.jpg

आपला पुत्र अक्षय याचा वध झाला हे ऐकून रावण संतापाने फुलून गेला आणि त्याने आपला बलवान पुत्र मेघनाद याला पाठवले. त्याला सांगितले की त्या दुष्ट वानराला मारू नकोस, बंदी बनवून इकडे घेऊन ये. बघूया की ते माकड आहे तरी कुठले. हनुमानाने पहिले की यावेळी भयानक योद्ध आला आहे. मेघनाद ताबडतोब समजून चुकला की हा कोणी सामान्य वानर नाहीये, तेव्हा त्याने ब्रम्हास्त्राचा वापर केला. तेव्हा हनुमानाने मनात विचार केला की जर ब्राम्हास्त्राला जुमानले नाही तर त्याची अपार महिमा धुळीला मिळेल. तेव्हा ब्रम्हबाणाने मूर्च्छित होऊन हनुमान वृक्षावरून खाली पडला. जेव्हा मेघनादाने पहिले की वानर मूर्च्छित झाला आहे, तेव्हा त्याला नागपाशाने बांधून तो घेऊन गेला.बंदी हनुमानाने जाऊन रावणाची सभा पहिली आणि त्याने स्वतःच आपल्या शेपटीने स्वतःसाठी एक आसन बनवले आणि त्यावर विराजमान झाला. रावण क्रोधीत होऊन म्हणाला कि, 'तू कोणत्या अपराधासाठी राक्षसांना मारलेस? तुला माझी शक्ती आणि माझा महिमा ठाऊक नाहीये का?' तेव्हा हनुमानाने रामाचा महिमा वर्णिला आणि रावणाला आपली चूक कबूल करून रामाला शरण जाण्यास सांगितले.