Android app on Google Play

 

परिचय

 


http://sivatemple.ca/wp-content/uploads/2015/12/hanuman1.png

हनुमान सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ आहे. हनुमानाविना ना राम आहे आणि ना रामायण. राम आणि रावणाच्या युद्धात हनुमान एकमात्र असा योद्ध होता ज्याला कोणीही कोणत्याही प्रकाराने इजा करू शकले नव्हते. प्रत्यक्षात हनुमानाचे पराक्रम, सेवा, दया, आणि दुसऱ्याचा गर्व हरण करण्याच्या अनेक गाथा आहेत, परंतु आम्ही त्यातील काही निवडक आणि प्रचलित कथांचे वर्णन केले आहे.हनुमानाचा जन्म चैत्र महिन्यात शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. हनुमानाच्या जन्म स्थानाबाबत काही निश्चित माहिती उपलब्ध नाहीये. मध्य प्रदेशातील आदिवासींचे म्हणणे आहे की हनुमानाचा जन्म रांची जिल्हाच्या गुमला परिमंडळात अंजन गावात झाला होता. कर्नाटक वासीयांची धारणा आहे की हनुमान कर्नाटकात जन्माला आला होता. कर्नाटकातील पंपा आणि हंपी येथे किष्किंधा चे भग्नावशेष आज देखील पाहता येऊ शकतात.