तनोत माता
तनोत हे राजस्थान मधील पाकिस्तानी सीमेजवळील एक गाव आहे. १९६५च्या भारत पाकिस्तानच्या लढाईत पाकिस्तानी सेनेने या १२०० वर्ष जुन्या मंदिरावर अनेक हल्ले केले, पण आश्चर्याची गोष्ट अशी की एकही बॉम्ब मंदिरावर पडला नाही आणि मंदिराच्या जवळ जे बॉम्ब पडले ते फुटलेच नाहीत. आजही या मंदिराच्या संग्रहालयात हे बॉम्ब प्रदर्शनासाठी ठेवले गेले आहेत. या मंदिराची सुरक्षा भारतीय सीमा दलाचे सैनिक करतात आणि रोज या मंदिरात पूजा करायला येतात.