Android app on Google Play

 

ओ पी बाबा मंदिर सियाचेन

 


अस म्हटले जाते कि ओम प्रकाश एक शूर सैनिक होते त्यांनी एकदा एकट्यानेच मलोन केंद्राला शत्रूंपासून वाचवले होते. महत्वाची गोष्ट अशी की त्यांना काय झाले ते कुणालाच माहित नाही. ऑफिसर्स सियाचेन पर्वताचे पद सांभाळण्या अगोदर त्यांचा आशीर्वाद घेतात आणि त्यांचे रक्षण केल्या बद्दल त्यांना धन्यवाद देतात. बरेच ऑफिसर आणि सैनिक जे तिथे तैनात असतात ते सांगतात की ओ पी बाबा त्यांना स्वप्नात येऊन पुढे येणाऱ्या संकटाची चेतावणी देतात. अस म्हटल जात की कर्नल नरेंद्र कुमार यांनी सियाचेन ग्लेशियरचा भारताकडील कोपरा खोलला त्या वेळी त्यांच्या हातातील कुऱ्हाड कुठेतरी पडली आणि ती भेटलीच नाही. एकदा ओ पी बाबा यांनी एका जवानाच्या स्वप्नात येऊन सांगितल की हि कुऱ्हाड जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत या सियाचेन ग्लेशियरचे रक्षण भारतीय सेनेला कराव लागेल.