Android app on Google Play

 

दक्षिण मुख नंदी तीर्थ कल्याणी क्षेत्र मंदिर

 


सन १९९७मध्ये कडू मल्लेश्वर मंदिराजवळ दक्षिण मुख नंदी तीर्थ या मंदिराची निर्मिती करण्यास सुरवात केली. खोदकाम सुरु असताना कारागिरांना एक नंदीची मूर्ती मिळाली. स्थानिक लोकांनी पुरातत्व विभागाला याची माहिती दिली त्यानंतर त्यांनी पुढील खोदकाम सुरु केले. पुरातत्व विभागाने सांगितले की हे मंदिर ४०० वर्ष जुने आहे. मंदिराच्या परिसरात शिवलिंगा सोबत नंदीची मूर्ती आणि एक तलाव आहे. पुरातत्व विभागाच्या लोकांनी जेव्हा नंदीचे तोंड साफ केले त्यावेळी ते आश्चर्यचकित झाले कारण नंदीच्या तोंडातून पाण्याचा झरा वहात होता आणि खालची जमीन साफ केल्यावर लक्षात आले की खाली शिवलिंग होते आणि नंदीच्या मुखातून वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी शिवलिंगावर पडत होते. नंदीच्या मुखातून वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी कुठून येत होते हे अद्यापही कुणाला कळलेले नाही हीच गोष्ट या मंदिराला रहस्यमयी बनवते.