हसरत शरीफुद्दीन शाहविलायत अमरोहा
शरीफुद्दीन शाहविलायत हे एक संत होते जे ईराण मधून भारतात आले होते. त्यांच्या मंदिरात नेहमी काळे विंचू भरलेले असतात. हे विंचू कुणालाही चावत नाहीत आणि ते भक्तांच्या अंगावर रेंगाळत असतात. हे काळे विंचू ज्या प्रजातीचे आहेत ती जात खुप भयानक असते, त्याचा एक डंकही माणसाच्या मृत्यूच कारण होऊ शकतो. भक्तांना विंचवाना घरी नेण्याची परवानगी आहे पण त्यांना ते ठरलेल्या तारखेला परत आणून द्यावे लागतात. मंदिरातून बाहेर गेल्यावरही हे विंचू चावत नाहीत पण ठरलेल्या तारखेला जर त्यांना मंदिरात आणून दिल नाही तर ते डंक मारतात.